Indian Railways News => Topic started by messanger on Jun 08, 2013 - 21:01:44 PM


Title - भूवनेश्वरीला गोंदिया तर गीतांजलीला भंडारा येथे थांबा
Posted by : messanger on Jun 08, 2013 - 21:01:44 PM

नागपूर

लोकमान्य टिळक टर्मिनस ( एलटीटी )- भूवनेश्वरी एक्स्प्रेसला गोंदिया येथे तर गीतांजलीला भंडारा येथे व आझाद हिंद आणि गोंडवाना एक्स्प्रेसला तुमसर येथे थांबा देण्यात आला आहे . हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर आहे .

मध्य रेल्वेने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार , एलटीएस - भूवनेश्वर - एलटीएस या द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला २५ मे पासून गोंदिया स्थानकावर थांबा देण्यात आला आहे . हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी राहील . १२८७९ एलटीएस - भूवनेश्वरी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस बुधवार व शनिवारी नागपूरला १३ . ४० वाजता येईल आणि १४ वाजता पुढील प्रवासाला निघेल . गोंदियाला १५ . ४५ वाजता आगमन होईल व १५ . ४७ वाजता सुटेल .

१२८८० भूवनेश्वर - एलटीएस ही द्विसाप्ताहिक गाडी सोमवार व गुरुवारी गोंदिया येथे २१ . ५३ वाजता येईल आणि २१ . ५५ वाजता सुटेल . नागपूरला आगमन मंगळवार व शुक्रवारी ०० . ०५ वाजता होईल व ०० . २० वाजता पुढील प्रवासाला निघेल .

दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार १२८५९ - १२८६० गीतांजली एक्सप्रेसला सहा महिन्यांसाठी ३० मे पासून भंडारा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे . १२८५९ मुंबई - हावडा गीतांजली एक्स्प्रेसचे भंडारा येथे १९ . ५१ वाजता आगमन होईल व १९ . ५३ वाजता सुटेल . १२८६० हावडा - मुंबई ही गाडी भंडारा येथे ६ . ०२ वाजता येईल व ६ . ०४ वाजता पुढे निघेल . १२१३० - १२१२९ आझाद हिंद एक्स्प्रेस तसेच १२४०९ - १२४१० गोंडवाना एक्स्प्रेस यांना तुमसर येथे थांबा देण्यात आला आहे . १२१३० पुणे - हावडा एक्स्प्रेसचे तुमसर स्थानकावर १४ . १३ वाजता आगमन होईल व १४ . १५ वाजता सुटेल . १२११९ हावडा - पुणे या गाडीचे तुमसर स्थानकावर आगमन ११ . २२ वाजता होईल व ११ . २४ वाजता ही गाडी पुढे निघेल . १२४०९ रायगड - हजरत निजामुद्दीन तुमसर स्थानकावर ११ . १३ वाजता येईल व ११ . १५ वाजता सुटेल . १२४१ - हजरत निजामुद्दी - रायगड या गाडीचे तुमसरला आगमन १० . ४२ वाजता व प्रस्थान १० . ४४ वाजता होईल .